बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल केले असून कर्नाटक सरकारने आणखी चार जिल्ह्यांत कोरोना निर्बंध शिथिल केले आणि वातानुकूलित वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ६ ते दुपारी १ या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी दिली.
आदेशानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव एन मंजुनाथा प्रसाद म्हणाले की दक्षिणा कन्नड, हसन, दावणगेरे आणि चमराजनगर जिल्ह्यात तातडीने प्रभावीपणे आणि ५ जुलै रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन नियम शिथिल केले गेले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम २४ अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांच्या उपयोगात, अध्यक्ष, राज्य कार्यकारी समिती, काही जिल्ह्यांमधील सध्याच्या कोरोना परिस्थितीचा अभ्यास करून, वातानुकूलित दुकाने वगळता इतर सर्व दुकानांच्या कामकाजास परवानगी देतात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी १ या वेळेत शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल सुरु राहणार आहेत. ” दरम्यान राज्यात कोरोना प्रकरणातील वाढ लक्षात घेता सरकारने २७ एप्रिलपासून निर्बंध लादले आणि संक्रमण कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने अंकुश शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.