बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यसरकारने खबरदारी म्हणून कोविडमुक्त रुग्णांना क्षयरोगाची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कर्नाटकमध्ये कोरोनामुक्त झालेले २३-२५ रुग्ण टीबी संक्रमितअसल्याचे आढळले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, आम्ही सर्व कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींची टीबी तपासणी करण्याचा विचार केला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी बरे झालेले कोविड रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वेच्छेने क्षयरोगाची (टीबी) तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यसरकारने खबरदारी म्हणून कोविडमुक्त रुग्णांना क्षयरोगाची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील २८ लाखांहून अधिक लोक कोविड संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना आणि टीबी दोन्ही फुफ्फुसांना संक्रमित करत असल्याने, राज्यभरात ३१ ऑगस्टपर्यंत अॅक्टिव्ह केस शोधणे (एसीएफ) मोहीम राबवली जाईल. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांतून बरे झालेल्या २४ कोरोना रुग्णांना टीबी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यसरकारने कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींची टीबी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.