बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मंगळवारी राज्यात ५,०४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी तीच संख्या ७,३४५ वर पोहोचली. तर राज्यात १४८ कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर राज्यात बुधवारी १७,९१३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २७,८४,२९६ वर पोहोचली. तर यापैकी २५,९९,४७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३३,२९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात सध्या सक्रीय प्रकरणांची एकूण संख्या १,५१,५६६ इतकी आहे. बुधवारी राज्यात सकारात्मकता दर ४.३५ टक्के होता, तर केस मृत्यु दर (सीएफआर) २.०१ टक्के होता.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी १,६११ कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. तर याच वेळी ५,५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला.