बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटाकात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात एकाच दिवसात दहा हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. दरम्यान मंगळवारी राज्यात १०,४५३ नवीन बाधित रुग्णांची भर पडली . राज्यात सर्वात जास्त रुग्ण राजधानी बेंगळूरमध्ये सापडले आहेत. बेंगळूरमध्ये मंगळवारी ४,८६८ इतके रुग्ण सापडले. तर राज्यात मंगळवारी ६,६२८ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. मंगळवारी राज्यात कोरोनाने १३६ जणांचा बळी घेतला.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०७७३७ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात ८७,४७५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.