बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना बाधितांच्या संख्येत मंगळवारी किरकोळ वाढ झाली. राज्यात मंगळवारी १,८७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून १,९४९ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. तसेच राज्यात १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आता पर्यंत ११,६९५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या २४,६१२ रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. मंगळवारी जिल्ह्यात ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली. याचवेळी राज्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या १८,०५७ वर पोहोचली. मंगळवारी १,२६७ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. तर १२ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४,०९० रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.