बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात मंगळवारी ३६४९ नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर बंगळूरमध्ये १७१४ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. तर मंगळवारी राज्यात एकूण ६१ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २२ जण बेंगळूरमधील आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण मंगळवारी ४४१४० वर पोहचले आहेत. मंगळवारी, राज्यातील विविध जिल्ह्यांतील १६६४ जणांना कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. तर बंगळूरमध्ये ५२०रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
बेंगळूरमध्ये एकूण सक्रिय प्रकरणे
मंगळवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण सक्रीय रूग्णांची संख्या २६७४६ वर गेली आहे. तर मंगळवारी शहरात २२ जणांचा मृत्यू झालं असून १७१४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ७२० लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याबरोबर राजधानीतही चिंतेचे वातावरण आहे.