बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (एस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी बेंगळूरच्या राजराजेश्वरी नगर (आरआर) विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार व्ही. कृष्णमूर्ती यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुमारस्वामी स्वतः उपस्थित होते.
जुलै २०१९ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे अपात्र आमदार एन. मुनिरत्न यांनी कॉंग्रेसकडून बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आर. आर. नगरची जागा रिक्त होती. ३ नोव्हेंबर रोजी होणार्या पोटनिवडणुकीसाठी आता मुनिरत्न भाजपच्या तिकिटार निवडणूक लढणार आहेत.