बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यास केंद्राने जर परवानगी दिली तर मी प्रथम लस टोचून घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जर निवडलेल्या प्रतिनिधींनाही ही लस दिल्यास सर्वसामान्यांना लसीबाबत आत्मविश्वास मिळेल आणि गोंधळ दूर होईल. दरम्यान माध्यमांच्या या सूचनेवर आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केंद्र सरकार निवडलेल्या प्रतिनिधींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करेल. ग्रीन सिग्नल मिळताच त्यांना प्रथम लस मिळेल. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी १० महिन्यांपासून परिश्रम घेतले आहेत.
मंत्री सुधाकर यांनी आरोग्य विभागाच्या जुन्या इमारतीतकोविड लस साठवणुकीशी संबंधित तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांनाशी बोलत होते. या केंद्रामध्ये सुमारे ४५ लाख व्हायोल ठेवल्या जाऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. हे राज्यातील सर्वात मोठे साठवण केंद्र आहे. बेंगळूरशिवाय, बेळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठे साठवण केंद्र आहे. येथे पाच प्रादेशिक मोठी साठवण केंद्रे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्टोरेज सेंटर तयार करण्यात आले आहेत. ९०० लॉजिस्टिक वाहने ही लस साठवणुकीपासून लसीकरण केंद्रापर्यंत नेतील. लसांची पहिली तुकडी एक-दोन दिवसांत कर्नाटकात पोहोचेल. केंद्र सरकार राज्यात १३.९० लाख लसीच्या कुपी पाठवेल.
राज्य शासनाने लस साठवण व लसीकरणाची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली. कोविड लसीकरण ड्राय रनमध्ये आलेल्या छोट्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य कर्मचारी लस घेण्यास उत्सुक आहेत. या लसीला कोणी विरोध केला नाही, असे ते म्हणाले.