कोडगू /प्रतिनिधी
कोडागु जिल्हा प्रशासनाने पर्यटकांवरील बंदी हटविली असून पर्यटन क्षेत्रावरील निर्बंध बुधवारपासून शिथिल केले आहेत. कोडागु जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रिसॉर्ट्स, होमस्टेज, हॉटेल व लॉजेस पर्यटकांसाठी खुल्या होऊ शकतात. तथापि, अॅबी फॉल्स, राजा सीट, इरपु फॉल्स आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यास बंदी आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान डोंगराळ जिल्ह्यात पर्यटनाच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली होती. इतर जिल्ह्यातील पर्यटकांनी योग्य कारणाशिवाय जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी जाऊ नये. इतर राज्ये आणि परदेशातील पर्यटकांना अनिवार्यपणे 14 दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे. पर्यटक फक्त नोंदणीकृत होमस्टेजमध्येच राहू शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हंटले आहे.
दरम्यान, म्हैसूर जिल्हा प्रशासनाने एचडी कोटे व आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळावरील बंदी उठवली आहे. २४ जुलैपासून एचडी कोटे आणि आसपासच्या पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, असे उपायुक्त अभिराम जी शंकर यांनी सांगितले आहे.
Previous Articleउत्तराखंडात कोरोनाग्रस्तांंचा आकडा 6588 वर
Next Article निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ज्यो बिडेन आघाडीवर
Related Posts
Add A Comment