बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षत घेता कोरोना व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यमंत्री सुधाकर यांनी, गेल्या वर्षी कोरोना काळात सुरु केलेल्या वॉर रूमचे कामकाज पुन्हा सुरू होईल, असे म्हंटले आहे.
“वॉर रूम गेल्या वर्षीप्रमाणे काम सुरू करतील ज्यायोगे सरकार वास्तवीक डेटाचा वापर करून परिस्थितीवर लक्ष ठेवू शकेल. दरम्यान तात्पुरते रहिवासी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ भरती करण्याचा निर्णयही घेतला आहे.”