बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात ड्रग्स तस्करी आणि त्याचे सेवन केल्याप्रकरणी कारवाई सुरु आहे. यामध्ये अभिनेत्री रागिणी आणि संजना त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सीसीबी कडून अटक करण्यात अली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मागील सरकारांवर राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यांकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ड्रॅग तस्करी मागील दहा वर्षांहून अधिक काळ चालू आहे पण मागील सरकारने याकडे डोळेझाक डोळेझाकपणा केला होता. पण आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहोत. ते राज्यातील बड्या लोकांमध्ये होणाऱ्या मादक पदार्थांच्या व्यापाराविषयी आणि पोलिसांच्या चौकशीविषयी प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनीही टीका केली आहे. ज्यात चित्रपट अभिनेते, राजकारणी आणि बड्या उद्योजकांची मुलेही सामील आहेत.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही. जो कोणी यात सामील आहे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच या तपासणीत काही जणांविषयी माहिती मिळाली आहे. सरकार आरोपींवर कडक कारवाई सुरू करेल असे त्यांनी म्हंटले आहे.