प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावात आलेल्या कर्नाटक मराठा समाजाचे मंजुनाथ स्वामींची मराठा समाजाच्यावतीने भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाज एकत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मराठा समाजातील युवकांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बीजेपीचे किरण जाधव, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सागर पाटील, महादेव पाटील, सूरज कोंडुसकर, गणेश दड्डीकर यासह क्षत्रिय मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.