बेंगळूर /प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्याच्या मुख्यमत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांशी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी दावा केला की राज्यात कोविड चाचण्यांची संख्या दररोज २० हजारावरून वरून ५० हजार झाली आहे. आणि लवकरच ती वाढवून ७५ हजार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हंटले आहे.
तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने कडेवर जरी केली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मीडिया बुलेटिननुसार, 10 ऑगस्ट रोजी झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या२२,६२० होती, ज्यात आरटी-पीसीआर म्हणून वर्गीकृत ८,१९३ रॅपिड अँटिंजन तपासणी चाचण्या आणि १४,४२७ चाचण्या समाविष्ट आहेत. आतापर्यंतच्या सर्वाधिक नमुन्यांची चाचणी ६ ऑगस्ट रोजी घेण्यात आली तेंव्हा राज्यातील ३० जिल्ह्यांमधून ४८,४२१ चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान, मंगळवारी ४३,९२४ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.