बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी भाजप सरकारवर व्हेंटिलेटर खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आणि सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे म्हंटले आहे. काँग्रेस नेते शिवकुमार यांनी बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा भ्रष्टाचार या व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्यात उघडकीस आल्याचे म्हंटले आहे.
शिवकुमार यांनी ट्विट केले की या व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्यात भाजप सरकारचा कोरोना भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. तामिळनाडू सरकारने प्रति व्हेंटिलेटर ४. ७८ लाखांवर विकत घेतले, पण तेच व्हेंटिलेटर कर्नाटक सरकारने ते प्रति १८.२० लाखांवर विकत घेतल्याचा आरोप केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी माध्यमातील एका बातमीचा संदर्भ दिला आहे.