बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील व्यंकटापुरा तांडा गावात शालेय माध्यान्न आहारामधल्या सांबारमध्ये मेलेला सरडा आढळला असून या सांबाराचे सेवन केलेले 80 शाळकरी मुले आजारी पडली.
व्यंकटापुरा तांडा येथील शासकीय प्राथमिक शाळेत ही घटना घडली. या सर्वांना तात्काळ राणीबेन्नूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे शिक्षण विभागातील अधिकऱ्यांनी सांगितले. उर्वरित ७८ विद्यार्थी प्राथमिक उपचारानंतर बरे झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, जेव्हा दुपारचे जेवण दिले जात होते तेव्हा एका मुलाला मेलेला सरडा पडलेले सांबर देण्यात आले. सरडा पाहताच त्या मुलाने इतरांना सावध केले आणि लगेच उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच इतर विद्यार्थीही आजारी पडू लागले. शाळा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत