बेंगळूर/प्रतिनिधी
नवी दिल्लीत शेती कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला सात महिने पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने कर्नाटकचे शेतकरी शनिवारी राज्यभर निषेधासाठी निदर्शने करणार आहेत, असे संयुक्त होराट (कर्नाटक) चे संयोजक जी. सी. बायरेड्डी यांनी सांगितले.
बायरेड्डी यांच्या माहितीनुसार ते राष्ट्रीय राजधानीतील आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असून कृषी कायद्याच्या निषेधार्थ उद्या राज्यभर निदर्शने करणार आहोत. बेंगळूर येथील “मौर्य सर्कल येथे शेतकरी आंदोलन करतील आणि शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन सादर करण्यासाठी भेटेल,” असं ते म्हणाले. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी यापूर्वी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक निदर्शने केली आहेत. दरम्यान, सात महिने उलटली तरी शेतकऱ्यांनी शेती कायद्या विरोधात लढा सुरूच ठेवला आहे.