बेंगळूर / प्रतिनिधी
साखरेच्या असलेल्या कमी किमती आणि कोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेला साखर उद्योग मात करण्यासाठी इथेनॉल युनिट्स आणि साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी बँकिंग नियमांचे उदारीकरण करण्याची विनंती कर्नाटकने केंद्राला केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्यावर साखर व वस्त्रोद्योग मंत्री शंकर. बी. पाटील मुनेनकोप्पा म्हणाले की, “गेल्या ४-५ वर्षांपासून साखरेचे दर पडल्यामुळे तसेच कोविड-१९ महामारीमुळे साखर कारखान्यांना डबघाईला आले आहेत.”
गेल्या वर्षी केंद्राने जाहीर केलेल्या साखरेचे निर्यात अनुदान या वर्षीही वाढवावे, अशी विनंतीही राज्यमंत्र्यांनी केंद्राला केली. तसेच ठिबक सिंचन अनुदान वितरण कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालक यांच्याकडे हलवण्याची विनंतीही त्यांनी गोयल यांना केली. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल पुरवठ्याचे बिल सध्याच्या 21 दिवसांऐवजी 7 दिवसांनी मंजूर करावे, यासाठी पावले उचलण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.