आमदार रोहन खंवटे,माजी आमदार आग्नेल फ्ढर्नांडिस यांची मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
दंडूके, चाकू, सळ्या, हॉकीस्टीक घेऊन कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंटवर सुमारे 80 अज्ञात जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. हल्ला नेमका का केला हे उघड झाले नसले तरी हल्ल्यात गोळीबारही झाल्याचे उघडकीस आले आहे. ज्याठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसत आहे तसेच रेस्टॉरंटच्या काचा फ्gढटलेल्या दिसत आहेत. या रेस्टॉरंटवर यापूर्वी दोनदा असाच हल्ला झाला होता. मंगळवारी झालेला हा तिसरा हल्ला होय. हल्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कळंगुटमध्ये लोकवस्तीत रेस्टॉरंटवर हल्ला करणाऱयांना अटक करावी, अशी मागणी माजी आमदार आग्नेल फ्ढर्नांडिस व आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे.
या हल्ल्यात तीघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 80 जणांच्या जमावाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यावर हल्ला करून अनेकांना जखमी केले. तसेच काचा व बाटल्या फ्ढाsडण्यात आल्या. हल्लेखोर पळाल्यावर पोलीस दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या इस्पितळात दाखल केले. या हल्यामागे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ व शीपाई विनय श्रीवास्तव यांचा संबंध असून दोघांच्या संगनमताने संशयितांनी पूर्वनियोजन करून कट रचला असल्याचा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे. या दोघांचेही व्यावसायिक यादव व प्लोटू यांच्याकडे साटेलोटे असून हे व्यावसायिक कळंगुट चालवितात असा आरोप करून मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
धाक दाखविण्यासाठी गोळीबार
जमावाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर धाक दाखविण्यासाठी गोळीबार केला असे येथील कर्मचाऱयाने सांगितले. या हल्यामुळे रेस्टॉरंटचे बरेच नुकसान झाले. हल्ल्यात माजी नौदल अधिकारी राजीव आरोरा व अन्य एक प्लोटू (गजेंद्रसिंग) नामक इसम यात सामिल असल्याचे पोलीस व आमदार खंवटे यांनी उघड केले आहे. वेश्या व्यवसाय, डान्सबार चे हे दोघे प्रमुख असल्याचे म्हटले असून हल्यामागे या दोघांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.
यापूर्वी दि. 1 नोव्हेंबर 2020 नंतर 15 मार्च 2021 व आता दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सौझा लोबोवर हल्ला झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून व पूर्वनियोजित करण्यात आला आहे. 2020 मध्ये समीर पावसकर याला पोलिसांनी अटक केली होती. 15 मार्च 21 रोजी गुंडांनी घुसून कुंपणाची भिंत ही मोडली होती. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हाकलण्यास 40 कोटीची ऑफ्ढर
सौझा लोबो हे आमचे पूर्वजकालिन रेस्टॉरंट आहे. आमच्या बाजूलाच दिल्ली येथील राजीव आरोरा हे मोठा हॉटेल प्रकल्प बांधून त्याजागी डान्सबार आणू पाहत आहेत. येथील सुनील भोमकर, गजेंदसिंग यांना पुढे काढून दिल्लीत राहून हे लोक आम्हा गोमंतकीयांना धमकी देऊन हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.यापूर्वी सुनील भोमकर या संशयितास घेऊन कळंगुट पोलीस निरीक्षक व शिपाई विनय श्रीवास्तव येथे घेउढन आले होते. आरोपींना पोलीस संरक्षण देवू लागले तर सामान्य जनतेचे काय ? आम्हाला येथून जाण्यासाठी दिल्लीतील राजीव आरोरा यांनी 40 कोटीची ऑफ्ढर दिली होती मात्र आम्ही ती धुडकावली, असे जुड लोबो व लावियान लोबो यांनी सांगितले.