प्रतिनिधी/ बेळगाव
उद्योग खात्रीतून वन विभागातील अखत्यारित येणाऱया काकती-होनगा येथे हे धरण बांधण्यात आले असून यासाठी वनविभाग आणि तालुका पंचायत तसेच ग्राम पंचायतीनेही पुढाकार घेतला. याची दखल राज्याचे पंचायत राज्य मुख्य सचिव एल. के. अतिक यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्मयातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वन्य विभागात अशा प्रकारे धरण निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हा उद्योग खात्रीला जर योग्य ठिकाणी वापर केल्यास विकास निश्चित आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयातील अधिकाऱयांचे कौतुक करण्याचीच ही बाब आहे, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱयांचे कौतुक केले.
काकती येथे असणाऱया अरण्य परिसरात प्राण्यांसाठी कोणतेच धरण अथवा पाण्याचे स्तोत्र नव्हते. त्यामुळे काही प्राणीही दगावले. याचा गांभीर्याने विचार करुन त्यांनी उद्योग खात्रीतून या धरणाच्या उभारणीला प्रारंभ केला. दररोज 500 कामगारांना या ठिकाणी काम देण्यात आले आणि बघता बघता धरण उभे झाले. आता यामध्ये पाणीही साचू लागले आहे. याची दखल घेत एल. के. अतिक यांनी पाहणी करुन अधिकाऱयांची पाठ थोपटली आहे.
बेळगाव तालुक्मयात प्राण्यांसाठी धरण बांधण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाला. काकती येथील अरण्य हे शेकडो एकरमध्ये पसरले आहे. या ठिकाणी प्राणी, पक्षी तसेच इतर जातीचे प्राणी आहेत. या धरणासाठी लागणारे दगड, माती हे उद्योग खात्रीतील कामगारांनीच टाकले. मोठय़ा प्रमाणात हे धरण उंच करुन या ठिकाणी प्राण्यांना वर्षभर पाणी पुरेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
राज्याचे पंचायत राज्य मुख्य सचिव एल. के. अतिक यांनी पाहणी दौऱयावेळी अधिकाऱयांना अजूनही ज्या ठिकाणी अशा धरणांची गरज आहे तेथे उद्योग खात्रीतून ती उभी करावीत व वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचनाही केल्या आहेत. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी केली ट्विट
काकती-होनगा येथे उद्योग खात्री योजनेतून उभारण्यात आलेल्या धरणांची प्रशंसा होत असतानाच राज्याचे पंचायत राज्य मुख्य सचिव एल. के. अतिक यांनी ट्विटव्दारेही या धरणाची कौतुक केले आहे. येथील अधिकाऱयांनी वन्य विभागात बांधलेले धरणे अनेक प्राणी पक्षांना लाभदायक ठरणार आहे. सर्वच ठिकाणी अशा प्रकारे धरणे बांधल्यास उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.