ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानने आपल्या स्वातंत्र्यदिनी काश्मीरचे फुटीरतावादी नेते आणि माजी हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वतंत्रता दिवस असतो. या दिवशी पाकिस्तान ने गिलानी यांना ‘निशान – ए – पाकिस्तान’ पुरस्कार दिला आहे.
गिलानी हे फुटीरतावादी नेते असून काश्मीरमध्ये त्यांनी भारतच्या विरोधात वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि यासाठी पाकिस्तानने त्यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी आपला नवा नकाशा जारी करत काश्मीरमधील विवादित भाग पाकिस्तानचा असल्याचे म्हटले होते.
स्वतंत्रता दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ रिजवी यांनी गिलानी यांना ‘निशान – ए – पाकिस्तान’ पुरस्कार प्रदान केला.
पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाद्वारे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.