प्रतिनिधी / बेळगाव
काहेर विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सतर्फे ‘जेएमपी’ सॉफ्टवेअरवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत विविध फार्मसी संस्थांच्या 40 हून अधिक जणांनी भाग घेतला. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मुरलीधर अनंत मूर्ती उपस्थित होते. प्रारंभी विभाग प्रमुख प्रा. राजश्री मासरेडी यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना मुरलीधर म्हणाले, आज तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकासाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा फार्मास्युटीकल उत्पादन विकासासाठी उपयोग महत्त्वाचा ठरतो आहे. अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनिल जलालपूरे यांनी तंत्रज्ञानाचा आजच्या व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग किती महत्त्वाचा आहे, यावर विवेचन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एम. बी. पाटील उपस्थित होते. डॉ. यु. बी. बालेमळ यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. अर्चना पाटील यांनी आभार
मानले.