वार्ताहर/ किणये
किणये ग्रामपंचायतीतर्फे मंगळवार दि. 11 पासून सॅनिटाझर फवारणीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व कोरोनाच्या प्रसाराला बेक लागावा यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावामध्ये फवारणी करण्यात येऊ लागले आहे.
मंगळवारी सकाळी बहाद्दरवाडी या गावातून सॅनिटायझर फवारणीला सुरुवात केली. फवारणीच्या वाहनाचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा स्नेहल लोहार, उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील, पीडीओ सुनिता पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी निलजकर, डांगे आदी उपस्थित होते.
बहाद्दरवाडी गावातील सर्व गल्ल्यांमध्ये व घरांमध्ये सॅनिटायझर फवारणी केली. रात्री किणये गावात फवारणी केली. गुरुवारपासून कर्ले, जानेवाडी, बामणवाडी, रणकुंडये, व शिवनगर या गावामध्येही फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायतीने दिली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करावे, तसेच विनाकारण घराबाहेर कुणीही पडू नये व मास्कचा वापर नियमित करावा असेही ग्राम पंचायतीच्यावतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.