वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील किया मोटर्सने 16 महिन्याच्या अवधीतच भारतात साधारण एक लाखाहून अधिक कार्स विक्री केल्या असल्याचे समजते. कनेक्टेड कार अंतर्गत विक्री करण्यात आलेल्या कार्सना भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. युव्हीओ कनेक्ट सिस्टीम या कारचे वैशिष्टय़ सांगितले जाते.
स्मार्टफोन व स्मार्टवॉच यांच्या वापरास सहकार्य करणारी ही प्रणाली आहे. 16 महिन्याच्या कालावधीतच किया मोटर्सने 1 लाख मोटारी विकण्यात यश मिळवले आहे. युव्हो कनेक्ट प्रणालीच्या कार्सच्या विक्रीचा वाटा भारतामध्ये 55 टक्के इतका असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सेल्टॉस जीटीएक्स प्लस या कार्सच्या एकंदर विक्रीतला वाटा 15 टक्के इतका मजबुत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान ही जमेची बाजू कंपनीच्या कारबाबत म्हणता येईल. या फीचरचे वैशिष्टय़ म्हणजे यावर कॉलिंगची सुविधा आहे.
त्याचप्रमाणे हवामानाची माहिती, वेळ आणि तारीख, क्रिकेट स्कोर नेव्हीगेशन, हवामान अंदाज अशा संबंधीची माहिती कार चालकाला मिळते.