सातारा / प्रतिनिधी
वाई येथील धुंडी विनायक चौकात काल सायकांळी 6 वाजण्याच्या सुमारास गाळ्यात पाणी का येते या कारणावरून दोन जणांना चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाणीची घटना घडली.यामध्ये दोन जण जखमी झाले असून या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश शंकर दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते व त्यांचा चुलत भाऊ सचिन दिघे या दोघांना दि.28रोजी सायंकाळी 6 वाजता धुंडी विनायक चौकात पालेकर बेकरी समोर मोकळ्या गाळ्यात पाणी का येते या कारणावरून दारूच्या नशेत हणमंत बाबुराव दिघे, सुमित हणमंत दिघे व अलका हणमंत दिघे, .सुप्रिया रणजित दिघे यांनी संगनमत करून लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली.भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या .लता व पंकज यांना मारहाण केली.मारहाणीत गणेश आणि सचिन हे दोघे जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली., चौघावर भा.द.वि.स.325,324, 323, 506,504, 510,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस माने या तपास करत आहेत.
Trending
- भारत-ऑस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीसी फायनल’ आजपासून
- राष्ट्रपती मुर्मू यांना सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- युद्धात युव्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट
- मणिपूरमध्ये शोधमोहिमेदरम्यान गोळीबार, जवान हुतात्मा
- सेन्सेक्स- निफ्टीमध्ये तेजीची झुळूक
- भाडेकरूंनाही मिळणार ‘गृहज्योती’चा लाभ
- माझगाव डॉक समभागाची दमदार वाटचाल
- 6 पाणबुड्यांच्या निर्मितीच्या करारासमीप भारत अन् जर्मनी