ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज पहाटे ढगफुटी होऊन 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. अद्याप 19 जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचाव कार्याला वेग आला असून, 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवाड जिल्ह्यातील दाछिनच्या होन्जार गावात ढगफुटी झाली. त्यानंतर 25 ते 26 लोक बेपत्ता झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, 5 मृतदेह बाहेर बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता 19 नागरिकांचा शोध सुरू आहे. किश्तवाड डोंगरी भाग असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मुसळधार पावसामुळे नेटवर्कची समस्या असून, संपर्क साधण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.