प्रतिनिधी /बेळगाव
आपण कधीतरी एकदा डायमंड (हिरा)चा दागिना घालावा असे स्वप्न बहुसंख्य महिलांचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी येथील पोतदार ज्वेलर्समध्ये ‘किस्ना डायमंड ज्वेलरी’ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. डायमंड म्हणजे महाग या संकल्पनेला छेद देणारा हा फेस्टिव्हल असून उच्चभ्रू वर्गाबरोबरच सर्वसामान्यांना परवडतील असे डायमंडचे दागिने या फेस्टिव्हलमध्ये आहेत.
मंगळवारी या फेस्टिव्हलला प्रारंभ झाला असून तो 15 नोव्हेंबर पर्यंत खुला आहे. फेस्टिव्हलच्या शुभारंभ प्रसंगी किस्नाचे एरिया सेल्स मॅनेजर श्रीधर कुकनूर तसेच पोतदार ज्वेलर्सचे निशिल, मिहिर व सर्वेश पोतदार उपस्थित होते.
या फेस्टिव्हलमध्ये अंगठी, मंगळसूत्र, नेकलेस, पेंडंट्स, बांगडय़ा, नथ आदी दागिन्यांचा समावेश असून, साधारण 5 हजार ते 10 लाखापर्यंत त्यांची किंमत आहे. सोने खरेदी इतकीच अलिकडच्या काळात प्रामुख्याने तरूणाईमध्ये डायमंड खरेदीची पेझ वाढत आहे. त्यामुळे 130 वर्षाची विश्वासार्ह परंपरा असणाऱया पोतदार ज्वेलर्समध्ये हा फेस्टिव्हल भरवण्यात आला आहे.
यासंदर्भात श्रीधर कुकनूर यांच्याशी संवाद साधता ते म्हणाले एच के ज्वेलर्स प्रा. लि. मुंबई तर्फे किस्ना डायमंड ऍण्ड गोल्ड ज्वेलरीचे उत्पादन होते. दागिन्यांचे उत्पादन प्रामुख्याने सुरतमध्ये होत असून, घनःश्याम ढोलकिया हे कंपनीचे मालक आहेत. देशात कंपनीची सात कार्यालये असून, एकूण 85 परदेशांमध्ये किस्नाचे दागिने निर्यात होतात. भारतातील 3 हजार 500 दुकानांमध्ये सध्या किस्नाचा फेस्टीव्हल सुरू आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 11 हजार कोटी इतकी आहे. पोतदार ज्वेलर्सला 130 वर्षाची परंपरा असून, या पेढीने ग्राहकांचा विश्वास मिळविला आहे. डायमंड ज्वेलरीमध्ये किस्ना दुसऱया क्रमांकावर असून, ई ऍण्ड एफ कलरचे डायमंड हे कंपनीचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक घरात एखादा तरी डायमंड असावा, तो पोतदारांकडून खरेदी केला जावा आणि तो किस्नाचा असावा. एका अर्थाने ‘घर घर किस्ना’ या संकल्पनेतून दिवाळीच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरविण्यात आले.