प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची हंगाम २०१९-२० ची प्रतिटन २९२९ रुपये प्रमाणे होणारी संपूर्ण एफआरपी रक्कम ऊस पुरवठादार सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. त्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कुंभी कासारी कारखान्याने २०१९-२० च्या गळीत हंगामामध्ये ४ लाख ९२ हजार ५४५ मेट्रिक टन ऊस गाळप करून ६ लाख ३५ हजार १४० साखर पोत्यांचे उत्पादन केले होते.कारखान्याने सरासरी साखर उतारा १२.८५ टक्के मिळवला होता. या हंगामात कारखान्याची एफआरपी प्रतिटन २९२९ रुपये असून हंगामाच्या सुरुवातीपासून १५ फेब्रुवारी अखेर गाळप केलेल्या ऊसाची एफआरपीची संपूर्ण रक्कम यापूर्वीच ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.
दि. १६ फेब्रुवारी ते हंगामअखेर गाळप झालेल्या ८९ हजार ३६१ मेट्रिक टन ऊसाची २९२९ रुपये प्रमाणे होणारी एफआरपी रक्कम २६ कोटी १७ लाख ४१ हजार रुपये होती. या रकमेपैकी सोसायटी वसूल रक्कम ३० जून २०२० पूर्वी वर्ग केली असून शिल्लक राहणाऱ्या ऊस बिलाची रक्कम १४ कोटी ३४ लाख रुपये दि.९ जुलै रोजी बँकेत वर्ग केली आहे.अशाप्रकारे कारखान्याने गत हंगामातील संपूर्ण एफआरपी ऊस उत्पादकांना आदा केली आहे.तसेच गत हंगामातील सवलतीच्या दरातील संपूर्ण साखर दिली आहे. यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी -वाहतूकदार, व्यापारी, कंत्राटदार,अधिकारी,कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याचे चेअरमन नरके यांनी सांगितले.आगामी २०२०-२१ च्या गळीत हंगामाचे गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक.
ऊस उत्पादकांनी आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन उत्तम वरुटे,सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील,चीफ अकाउंट अनिल यादव उपस्थित होते.
Previous Articleगोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे आत्महत्या
Next Article रत्नागिरीत २५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
Related Posts
Add A Comment