सांगरूळला २५ वर्षानंतर संधी
प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी पै. निवास निवृत्ती वातकर (रा.सांगरूळ ता.करवीर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रादेशिक साखर सहसंचालक एस.एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मावळते व्हाईस चेअरमन उत्तम वरुटे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
व्हाईस चेअरमनपदासाठी वातकर यांचे नाव संचालक जयसिंग पाटील (यवलुज) यांनी सुचवले, त्याला आनंदा पाटील (पाडळी खुर्द) यांनी अनुमोदन दिले. या पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने वातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नूतन व्हाईस चेअरमन वातकर यांचे अभिनंदन करून राज्यातील साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी असल्याचे सांगितले.१९९८-९९ पर्यंत साखर कारखानदारी चांगल्या परिस्थितीत होती, मात्र त्यानंतर उसाचा दर आणि साखर उत्पादन खर्चात तफावत निर्माण झाल्याने गेली सात ते आठ वर्ष उसाची एफआरपी देताना साखर कारखान्यांना तोटा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारो कोटी रुपये उत्पन्न देणाऱ्या साखर कारखान्यांना केंद्र व राज्य शासन अनुदान देत नाही आणि कर्जामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने साखरेचा दर प्रतिकिलो ३७ रुपये करावा किंवा एफआरपी देताना झालेल्या तोट्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने एकाचवेळी सुरू करण्याची परवानगी साखर सहसंचालकांनी द्यावी असे ते म्हणाले.५० लाख लोकांचे जीवनमान अवलंबून असणाऱ्या साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारने अनुदान द्यावे, आ
Previous Articleबेळगाव जिह्यात गुरुवारी 185 जणांना कोरोनाची बाधा
Next Article अज्ञात वाहनाच्या ठोकरीने अनोळखीचा मृत्यू
Related Posts
Add A Comment