वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ातील कुडलसंगम येथे पूजावनात चंदन लाकडाचे तुकडे मिळाले असून गेल्या काही दिवसांपासून येथील चंदनाची झाडे तोडून चोरी होत असल्याचे प्रकार होत आहेत.
कुडलसंगम पूजावन व अन्य प्रदेशात चंदन झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली असून येथे झाडांची कत्तल करून चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. तरी कुडलसंगम प्राधिकार अधिकाऱयांनी फिर्याद देऊन चोरीचा तपास करावा, अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.