ऑनलाईन टीम / मुंबई :
‘कुमकुम भाग्य’ मालिकेत इंदू दादीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झरीना खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याच्या निधनाच्या बातमीने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री सृती झाने व्हिडिओ आणि एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर अभिनेता शब्बीर अहलुवालिया याने देखील झरीना खान यांच्या सोबतचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये ‘ये चांद सा रोशन चेहरा’ असे म्हटले आहे.

झरीना खान यांनी कुमकुम भाग्य मालिकेसह ‘ये रिश्ता क्या कहलाता हैै’ या मालिकेत देखील काम केले आहे. मात्र, त्यांचा अचानक जाण्याने सर्वांना दुःख झाले आहे. दरम्यान, या वर्षात काही कलाकारांचा कोरोनामुळे तर काहींचा अन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे.