साहित्य : 1 वाटी दही, अर्धी वाटी पनीर, 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे कोथिंबीर चिरून, 1 चमचा मिल्क पावडर, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, चवीपुरते मीठ, 1 चमचा चिल्लीफ्लेक्स, पाव वाटी कॉर्नफ्लोर, अर्धी वाटी बेडक्रम्स, तेल तळण्यासाठी
कृती : स्वच्छ सुती कापड घेऊन त्यात दही ओतून गुंडाळून ठेवावे. म्हणजे त्यातील ज्यादाचे पाणी निथळेल. अथवा त्यावर वजनदार वस्तू ठेवल्यास त्यातील पाणी निथळेल. नंतर सुती कापडातील दही बाऊलमध्ये काढून त्यात पनीर कुस्करून घालावे. नंतर त्यात धणे पावडर, कोथिंबीर, मिल्क पावडर, हिरवी मिरची, मीठ, चिल्लीफ्लेक्स आणि कॉर्नफ्लोर मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. नंतर त्याचे छोटे गोळे बनवून त्याला उभट अथवा गोलाकार आकार देऊन पाच ते सात मिनिटे ठेवावे. नंतर बेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. आता तयार कुरकुरीत दही पुदिना चटणी अथवा सॉससोबत खाण्यास द्या.