ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसून, शोध मोहीम सुरू आहे. काश्मीर झोन आयजी विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शनिवारी रात्री कुलगाममध्ये तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत पहाटे एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, शोधमोहीम अद्याप सुरू आहे.