प्रतिनिधी / वास्को
कुवेतहून 137 प्रवासी घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान रविवारी रात्री आठच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. गो एअर जी87463 या विमानातून हे प्रवासी उतरले. या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना खासगी बसमधून उत्तर व दक्षिण गोव्यातील हॉटेलमध्ये कॉरन्टाईनसाठी पाठविण्यात आले. या प्रवाशांपैकी महाराष्ट्र व कर्नाटकातील दहा प्रवासी आपल्या राज्याकडे रवाना झाले.