सांगरूळ / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यस्तरीय महामेळावा कोल्हापूर येथे होणार असून या मेळाव्यासाठी कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे राज्यभरातून पदाधिकारी कोल्हापूर कडे रवाना झाले आहेत .कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या जिल्हा कार्यकारणीने राज्यव्यापी महा मेळाव्याची जंगी तयारी केली आहे . राज्यभरातून कुस्ती क्षेत्रातील नामवंत आजी-माजी पैलवान वस्ताद यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे
श्री दत्त समर्थ सांस्कृतिक भवन कोल्हापूर पन्हाळा रोड शिवाजी पुलाजवळ आंबेवाडी कोल्हापूर येथे हा मेळावा होणार असून रविवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्याटन होणार आहे .आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच काका पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महामेळाव्यात राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते डी .वाय .एस .पी राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
मेळाव्याच्या तयारीबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै . गणेश मानुगडे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीकला वाढीस लावण्याचे कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे प्रमुख ध्येय आहे .राजश्री शाहू महाराजांनीही कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरची कुस्ती सातासमुद्रापलीकडे जागतिक स्तरावर पोचविण्याचे काम केले आहे .
शाहू महाराजांच्या नगरीत कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा पहिला राज्यस्तरीय महामेळावा होत आहे हे अभिमानास्पद आहे . या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करून महामेळाव्याचे जंगी तयारी केली आहे .राज्यभरातून कुस्ती क्षेत्रातील तितकाच दिग्गज मल्ल व वस्ताद मंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे .
कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पै .संग्राम कांबळे यांनी कुस्तीमल्लविद्या महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कुस्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण भारतभर ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे .हे कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे .
कुस्ती क्षेत्राच्या या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज आजी-माजी पैलवान उपस्थित राहणार आहेत .यावेळी कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या वस्ताद मंडळींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी पैलवान वस्ताद,व कुस्ती शौकीनानी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन पै . संग्राम कांबळे यांनी यावेळी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै.गणेश मानुगडे ,कुस्ती मल्लविद्या महासंघ मुख्य प्रवक्ता पै.संग्राम कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्ष वस्ताद बाबाराजे महाडीक, करवीर संपर्क प्रमुख जयवंतराव पाटील ,कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते.दत्ता ठाणेकर,पन्हाळा तालुका प्रमुख विकी माने,गगनबावडा तालुका प्रमुख बिडकर ,कोल्हापूर जिल्हा सरचिटनीस डॉ.प्रकारा पोवार,कोल्हापूर प्रसिद्धी प्रमुख भरत कुमार पाटील,शिरोळ तालुका प्रमुख.पै. स्वप्निल कोरवी ,भुदरगड तालुका प्रमुख पै.युवराज पाटील,सचिन तानाजी राठोड ,परशुराम बंगे यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.