प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य खाते खबरदारीच्या उपाययोजना राबवित आहे. या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयातही खबरदारी घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या कक्षाचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना भेटण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होत असल्याची टीका होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयामार्फत लष्करी परिसरासह सर्वसामान्य नागरिकांनादेखील सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यामुळे विविध तक्रारी किंवा कार्यालयीन कामानिमित्त नागरिक तसेच माजी सदस्य मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात. पण मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या कक्षाचे प्रवेशद्वार कोरोनाच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट होणे मुश्कील बनले आहे. तसेच कोरोनाच्या धास्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांना, माजी सदस्य आणि वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधींना भेटण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कक्षाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले असून कार्यालयातील आतील दरवाजाने भेट घेण्याचे पत्रक लावण्यात आले आहे. पण कार्यालयात असलेल्या आतील दरवाजाने भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, साहेब कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना व माजी सदस्यांना तक्रारी मांडणे मुश्कील झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या कक्षाचे प्रवेशद्वार कधी खुले होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.