कोरोनातून बरे झाल्यानंतर आजाराचे दुष्परिणाम अनेक रुग्णांवर पाहवयास मिळत आहेत.
- इंग्लंडमधील नव्या अभ्यासानुसार कोविडमधून बरे झालेले रुग्णांना मानसिक आजार होण्याचा धोका अधिक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
- द लान्सेटच्या अहवालानुसार कोविडमधून बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 18 टक्के जणांना नैराश्य, चिंता आणि डिमेंशिया यांसारख्या मानसिक आजारांची लक्षणे पहावयास मिळाली आहेत. अभ्यासानुसार ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली नाही, त्यातुलनेत कोरोनाबाधितांना मानसिक आजार होण्याची समस्या दुप्पट असल्याचे दिसून आले.
- इक्वाडोर येथे अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात कोविडमधून बरे झालेले रुग्ण हे चिंता, निद्रनाश आणि नैराश्य, एकलकोंडेपणात अडकण्याची भीती अधिक राहते. कोरोना संसर्गाचे विषाणू हे केवळ मेंदूवरच नाही तर मेंदूच्या कार्यशैलीवरही परिणाम करतात. कोरोनामुळे मेंदूवर होणार्या परिणामाचे आकलन करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरत आहे.
- ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एनएचआर ऑक्सफर्ड हेल्थ बायोमेडिकल रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी अमेरिकेत 69 दशलक्ष नागरिकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. त्यात कोविडमधून बरे झालेल्या 62 हजारांहून अधिक रुग्णांचा समावेश होता. अभ्यासानुसार कोविडमधून बरे झालेले सुमारे 6 टक्के ज्येष्ठ नागरिक हे तीन महिन्यांच्या आतच मानसिक विकाराने ग्रस्त झाल्याचे आढळून आले.
- कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांत मूड आणि अंक्झायटी डिसऑर्डर होण्याची शक्यताही दुप्पट राहू शकते. कोरोनाग्रस्त राहिलेल्या वयस्कर रुग्णांत डिमेंशिया होण्याचा धोका दोन ते तीन टक्के अधिक अधिक राहतो.