गुजरातपेक्षा निम्मी मदत दिली असती तर समाधान वाटले असते
सांगली / प्रतिनिधी
मागील महिन्यात आलेल्या तौंक्ते वादळाच्या तडाख्याने कोकणात मोठे नुकसान झाले. या वादळामध्ये महाराष्ट्र सोबत गुजरातचेही नुकसान झाले. यावेळी पंतप्रधानांनी गुजरातची हवाई पाहणी करून गुजरातला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र महाराष्ट्राला त्याच्या एक रूपायाही दिला नाही. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला. हा अन्याय असल्याचे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा चौपट म्हणजे 252 कोटी रुपयांची तात्काळ मदत केली. वादळानंतर 20 दिवसांनी केंद्रीय पथक कोकणचे पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करण्यापेक्षा त्यांनी आरोप केला. नानार प्रकल्प यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे.तो प्रकल्प होणार नाही. लोकांचा विरोध आहे प्रकल्प रद्द केल्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसणार, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये बहुतांशी ग्रामपंचायतीतील शिवसेनेने जिंकले आहे. त्यामुळे तेथील लोक सेनेच्या पाठीशी असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगलीत सांगितले.