ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. पीयुष गोयल यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
चंद्रकांता गोयल भाजपच्या नेत्या होत्या. तीन वेळा त्या विधानपरिषदेच्या सदस्य राहिल्या होत्या. ‘आपल्या स्नेह आणि प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई आज स्वर्गवासी झाली. तिने संपूर्ण आयुष्य सेवकार्यात व्यतीत केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो. ओम शांती:’, असे गोयल यांनी ट्विट केले आहे.