प्रतिनिधी / खेड :
निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या कोकणाची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 12 जून रोजी कोकण दौऱयावर येणार असल्याची माहिती रिपाईंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी ते मुंबईहून मंडणगडकडे रवाना होणार असून सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी आंबडवे येथे भेट देऊन वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मंडणगड तालुक्यातील सावरी, पचारळ, वेळास, बाणकोट या गावांना भेट देवून रायगड जिह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमंडला, हरिहरेश्वर, आदगाव या गावांना भेटी दिल्यानंतर माणगावमार्गे मुंबईला परतील. या दौऱयात कोकण प्रदेश अध्यक्ष तथा जगदीश गायकवाड, कोकण ज्येष्ठ नेते दादा मर्चंडे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबईचे अध्यक्ष विवेक पवार, कार्याध्यक्ष सुमित मोरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण जनता परिषदेचे सरचिटणीस अमित तांबे, रत्नगिरी जिल्हाध्यक्ष के. डी. कदम, सरचिटणीस प्रीतम रुखे, जिल्हा प्रवक्ते अनंत पवार, युवक जिल्हाध्यक्ष आदेश मर्चडे, खेड तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, युवक अध्यक्ष विकास धोत्रे सहभागी होणार आहेत.