ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
इस्त्रायल एनएसओकडून विकले जाणारे हेरगिरीसाठीचे पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञान भारत सरकारने खरेदी केले असण्याची शक्यता काँग्रेसचे ज्येष्ट नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारवर याबाबत सर्वाच्च न्यायालयात आपली बाजु मांडत आहे. इस्रायलची एनएसओ ही संस्था खासगी आस्थापनांना स्पायवेअरची विक्री करीत नाही असे राजदूतांनी म्हटले आहे. याचाच अर्थ हे स्पायवेअर सरकारने खरेदी केले असा होत आहे. असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी चौकशीकरिता तज्ज्ञ समिती नेमली असुन ही समिती केंद्र सरकारने इस्रायली स्पायवेअरचा गैरवापर केला किंवा नाही याचा शोध घेतला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणावरही पाळत ठेवण्याचा मुक्त परवाना सरकारला नाही. या स्पायवेअरच्या प्रकरणात आपण केवळ प्रेक्षक बनणार नाही अशी ही भुमिका आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शहाणपणाचा व धाडसी आहे, त्यामुळे या प्रकरणातील पहिला सांगाडा बाहेर पडला आहे.
काल इस्रायलच्या राजदूतांनीही एनएसओ समूह हे स्पायवेअर कुठल्याही देशाच्या सरकारलाच विकते, खासगी आस्थापनांना विकत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे हे स्पायवेअर भारत सरकारनेच खरेदी केले असा त्याचा अर्थ होतो, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.पेगॅसस सॉफ्टवेअर भारत सरकारने खरेदी केले हे दूरसंचार मंत्री मान्य करणार का, असा सवालही त्यांनी केला आहे. जर सरकार यावर शांत राहिले तर तो सरकारच्या प्रगती पुस्तकातील एक ठपका असेल असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाजप नेमकी काय ठोस भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.