प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याने जिल्ह्यातील केअर सेंटर बंद झाली आहेत. तेथे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुक्त केले आहे. त्यांना रिक्त पदावर संधी मिळावी, अशी मागणी शुक्रवारी परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात कोरोना काळात केअर सेंटरमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, फॉर्मासिस्ट, स्टाफ नर्स आदींनी चांगले काम केले. पण जिल्हा 90 टक्के कोरोनामुक्त झाल्यानंतर केअर सेंटर बंद झाली. त्यामुळे चांगली नोकरी सोडून येथे आलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी प्रशासनाने जिल्हÎातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांत त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.