प्रतिनिधी /बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे येथे दुखापतीमुळे सात वर्षापासून मान दुखीचा त्रास असणाऱया एका 78 वषीय रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रायबाग तालुक्मयातील निलजी गावातील हे 78 वषीय गृहस्थ मान दुखीच्या त्रासाने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना अशक्तपणा, चालण्यास त्रास अशी लक्षणेही जाणवू लागली.
तपासणीकरीता त्यांच्या मणक्मयाला इजा झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी टायटॅनियम स्प्रु आणि रॉड्सचा वापर करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. आणि पाच दिवसानंतर त्यांना उभे राहणे आणि चालणे शक्मय झाले. केएलईमधील न्यूरो सर्जन डॉ. विक्रम टी. पी. डॉ. प्रकाश राठोड, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. टीना देसाई यांनी ही शस्त्रक्रिया केली. पाठिचा कणा मेंदू व मेंदूच्या प्रमुख भागांना रक्त पुरवठा करणाऱया रक्तवाहिन्या, शरीरासाठीच्या हालचालीसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व नाजूक होती. परंतु हॉस्पिटलमधील सर्व तंत्रज्ञान व सुविधा यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. याबद्दल हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.