प्रतिनिधी / बेळगाव
काहेर इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओ थेरपीच्या 2016 च्या बॅचचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काहेरचे कुलगुरु प्रा. डॉ. विवेक सावजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोनिपथ हरियाणा येथील ऋषिहुड विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. नितेश बन्सल उपस्थित होते.
कॉलेजच्या गव्हर्निंग कमिटीचे चेअरमन डॉ. व्ही. एस. साधुण्णावर, म्हैसूर येथील जेएसएस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. कविता राजा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. आनंद हेगण्णावर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व पदवीधारकांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. डॉ. कविता राजा यांनी शपथ दिली. यावेळी प्राचार्य डॉ. संजीवकुमार, डॉ. जीबा चित्रा, उपप्राचार्य डॉ. विजय कागे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्नेहल धर्मायत व डॉ. पीयुषा गुरुदुट यांनी केले. डॉ. अक्षता महिंद्रकर यांनी स्वागतगीत सादर केले.