कलाश्री ग्रुप योजनेतून ग्राहकांना बक्षीस जाहीर
प्रतिनिधी /बेळगाव
येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरतर्फे 2021 मधील भव्य बक्षीस योजनेची 12 वी सोडत दि. 20 रोजी झाली. या सोडतीचे इलेक्ट्रिक स्कूटी हे बक्षीस केदनूर येथील सौंदर्या विलास अजाणी यांना मिळाले.
सिव्हिल इंजिनिअर आनंद कुलकर्णी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव जिल्हाप्रमुख किरण गावडे, शिवनेरी इंटरप्रायझेसचे संचालक गजानन बाडीवाले, सुभेदार मेजर रवळनाथ यादव, खादरवाडी विठ्ठल-रखुमाई मंदिर कमिटी अध्यक्ष परशराम गोरल तसेच कलाश्री ग्रुपचे संचालक प्रकाश डोळेकर यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.
उत्तेजनार्थ 6 जणांना मोबाईल हँडसेट देण्यात आले. यामध्ये हुक्केरी येथील सुरेश पटरुट, हिंडलगा येथील राहुल कडोलकर, कुसमळी येथील श्रेयस शेट्टी, हिंडलगा येथील पितांबर सोमनाथ, धामणे येथील यल्लाप्पा डुकरे, अनगोळ येथील समृद्धी रेडेकर यांचा समावेश आहे.
या योजनेतील 12 वी सोडत यशस्वी पार पडली असल्याने पुढील 3 बंपर ड्रॉ व्यतिरिक्त सभासदांना शेवटी देण्यात येणाऱया वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. सभासदांनी शोरुममधील आपली आवडती वस्तू घेऊन जावी, असे आवाहन कलाश्री गुप ऑफ इंडस्ट्रिजचे संचालक प्रकाश डोळेकर यांनी केले आहे.