पुणे / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला राजस्थान रॉयल्सविरुद्ध निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या लढतीत हैदराबादला 61 धावांनी पराभव पत्करावा लागला.
‘पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या लढतीत सनरायजर्स हैदराबादने संथ गतीने गोलंदाजी केली आणि यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचा हा पहिला भंग असल्याने कर्णधार केन विल्यम्सनवर 12 लाख रुपयांचा दंड लागू केला गेला आहे’, असे आयपीएल कार्यकारिणीने पत्रकाद्वारे जाहीर केले.