ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कालानुसार डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकार सत्तेत कायम राहण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात थेट लढत असून, आतापर्यंच्या कलांनुसार एलडीएफने 91 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफने 45 जागांवर मुसंडी मारली आहे. भाजप 4 जागांवर पुढे आहे.