तिरुवनंतपुरम \ ऑनलाईन टीम
केरळ उच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. आता १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींनाही त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एका ९ वर्षाच्या मुलीने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने २३ ऑगस्ट रोजी आपल्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात जाण्याची मागणी केली होती. याप्रकरणी या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीला दहा वर्ष होण्यापूर्वी सबरीमाला मंदिरात जायचे आहे. कारण यानंतरती चार दशकांहून अधिक काळ मंदिरात जाऊ शकणार नाही.
या मुलीच्या याचिकेवर न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्या मुलीला तिच्या वडिलांसोबत २३ ऑगस्टला शबरीमला दर्शनासाठी जाण्यासाठी परवानगी देण्याचा अंतरिम आदेश जारी केला जाऊ शकतो.
यापूर्वी एप्रिलमध्ये असाच एक निकाल न्यायालयाने दिला होता. त्यात लसीकरण झालेल्या व्यक्तींसोबत लहान मुलांना सर्व कार्यक्रमांमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
Related Posts
Add A Comment