नवी दिल्ली : किया मोर्ट्स कॉर्पोरेशनच्या मालकीची कंपनी किया मोटर्स इंडियाने सणासुदीच्या दिवसांमध्ये सुरक्षा आणि सुविधा वाढविण्यावर भर दिल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस आणि पेपरलेस विक्रीनंतर सेवा देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने ऍडव्हान्स पिक अप ऍण्ड ड्रॉपची सुविधाही सुरु केली आहे. आगामी काळात कंपनी संपूर्णपणे पेपरलेस प्रक्रियेच्या मदतीने ग्राहकांना लाइव्ह वाहन ट्रेकिंगची सुविधाही देणार असल्याचे संकेत आहेत. या अगोदर कंपनीने ‘माय कन्वीनियन्स सर्व्हिस’ लाँच केली आहे. जी ग्राहकांना व्यक्तीगत रुपाने वाहन मेंटेनेंसची सवलत देते.
Previous Articleबीपीसीएलच्या खरेदीसाठी अनेकांची बोली
Next Article अभ्यासासाठी आता इलेक्ट्रॉनिक टॅबलेट
Related Posts
Add A Comment