बेंगळूर : विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. पुढील 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. विद्यार्थ्यांना लस देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली. विधानसौध येथे पत्रकारांशी ते बोलत होते. महाविद्यालयांमध्ये लसीकरण होणार असून त्याची जबाबदारी प्राचार्यांवर असणार आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना लस मिळेल यासाठी व्यवस्था करावी. महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर कर्मचाऱयांनीही लस घ्यावी. महाविद्यालये सुरू होत असताना विद्यार्थ्याने लस घेतलेली असावी. अन्यथा त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले.
Previous Articleएकाच कुटुंबातील तिघांची गळफासाने आत्महत्या
Next Article राज्यात कोरोनाच्या 3,222 नव्या रुग्णांची नोंद
Related Posts
Add A Comment