खेड / प्रतिनिधी
दीपावली सुट्टीच्यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी 22 डब्यांची मडगाव-पनवेल फेस्टिवल स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही स्पेशल मडगाव येथून 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 3 वाजून 15 मिनिटांनी पनवेलला पोहचेल.
परतीच्या प्रवासात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पनवेल येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मडगावला पोहचेल. या स्पेशल गाडीला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.